दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ! व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव संमत

681

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभागात शिक्षण घेत असलेल्या अतिवृष्टी व ओला दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी झाली. या बैठकीत दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीचा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. सर्व सदस्यांनी एकमताने हा ठराव मंजूर केला.

विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील 42 विभाग व धाराशिव उपपरिसरातील दहा विभागांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. संभाजीनगर मुख्य परिसरात विविध अभ्यासक्रमांत 4 हजार 639 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर धाराशिव उपपरिसरात दहा विभागांत 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील गावे याबद्दल शासन निर्णय असेल त्याप्रमाणे या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या