सरकार कोणता खेळ करत आहे, लॉकडाऊनचा विषय कोणी काढला? काँग्रेसचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती आणि इंधनाचे दर गगनाला भिडत आहे. तसेच देशभरात इंधन, एलपीजी, पेट्रोल, डिझेलच्या टंचाईबाबतचे वृत्त येत आहे. या सर्व परिस्थितीबाबत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत संबोधन देताना आपल्याला कोरोना आणि लॉडाऊनसारख्या मोठ्या संकटाशी सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा सुरू होती. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लॉकडाऊनची कोणतीही शक्यता फेटाळून लावली आहे. त्याबाबत खेरा यांना विचारले असता त्यांनी मोदी सरकारचा चांगला समाचार घेतला.

खेरा म्हणाले की, लॉकडाऊनबद्दलची ही चर्चा आम्ही आजच पहिल्यांदा ऐकली आहे. हे आमच्याशी कोणता खेळ खेळत आहेत? आम्ही लॉकडाऊनबद्दल कधीच काही विचारले नव्हते. मग याबद्दलच्या अफवा कोण पसरवत आहे? असा सवाल करत त्यांनी लॉकडाऊन, कोरोना याची आठवण कोणी करून दिली, याबाबत कोणी वक्तव्य केले. याबाबतच्या अफवा कोण पसरवत आहे, असे प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारविच निशाणा साधला आहे.