
जर तुमच्या बँक खात्यात चार-पाच वर्षे तुम्ही कोणताही व्यवहार झाला नाही की ते खाते ‘डॉरमन्ट’ किंवा ‘इनऑपरेटिव्ह’ म्हणजेच निक्रिय श्रेणीत जाते.
अशा खात्यातून एटीएम, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे व्यवहार बंद होतात. हे खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला शाखेला भेट देऊन केवायसी करा
पॅन कार्ड, आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवा. कागदपत्रे दिल्यानंतर खात्यात छोटी रक्कम जमा करा किंवा काढा. खाते सक्रिय होईल.
जास्त काळ व्यवहार न झाल्यास, बँक अशा खात्यांची माहिती ‘अनक्लेम्ड डिपॉझिट्स’ या आरबीआयच्या निधीमध्ये वर्ग करू शकते, जी नंतर पुन्हा मिळवता येते.
खाते सक्रिय करण्यासाठी कोणालाही बँक पासवर्ड किंवा ओटीपी सांगू नका. अधिक माहितीसाठी, थेट तुमच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागेल

























































