
तुमच्या घराची नोंदणीची कागदपत्रे गहाळ झाली असतील, तर तुम्हाला डुप्लिकेट कागदपत्रे मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या प्रक्रियेला विलंब करू नये.
पोलिस ठाण्यात जाऊन हरवलेल्या कागदपत्रांची तक्रार दाखल करा. तुम्ही हरवलेल्या कागदपत्रांची माहिती आणि तपशील पोलिसांना द्या.
हरवलेल्या कागदपत्रांची माहिती आणि तुमचा संपर्क तपशील देऊन वृत्तपत्रांत जाहिरात द्या. कायदेशीर सल्लागार किंवा मालमत्ता तज्ञांशी संपर्क साधा.
घराची नोंदणी ज्या उपनिबंधक कार्यालयात झाली आहे, तिथे जाऊन डुप्लिकेट कागदपत्रांसाठी अर्ज करा. अर्जासोबत एफआयआरची प्रत, वृत्तपत्रातील जाहिरात, आवश्यक कागदपत्रे द्या.
उपनिबंधक कार्यालयाकडून डुप्लिकेट कागदपत्रे मिळवण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल. या सर्व प्रक्रियेला उशीर करू नका.