
फसवणूक करणारे लोक तुमच्या पॅनकार्डचा वापर तुमच्या नावावर नवीन बँक खाते उघडण्यासाठी, कर्ज किंवा व्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी करू शकतात.
त्याचा परिणाम तुमच्या व्रेडिट स्कोअरवर दिसून येईल. जर तुम्हाला अनोळखी कर्ज, व्रेडिट कार्ड किंवा अचानक चौकशी दिसली तर समजून घ्या की, काहीतरी गडबड आहे.
काही यूपीआय अॅपवरून व्रेडिट स्कोअर तपासता येईल. काही व्रेडिट ब्युरोच्या वेबसाईटवरूनही व्रेडिट स्कोअर तपासता येईल.
कोणी तुमचा पॅन नंबर वापरत असेल तर त्वरित आपल्या बँकेला सूचित करा आणि संशयास्पद खाते किंवा कर्ज बंद करा. सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करा.
पॅनकार्ड लॉक करण्यासाठी इन्कम टॅक्स वेबसाईटला भेट द्या. कोणत्याही अज्ञात किंवा संशयास्पद व्यक्तीला आपला पॅन नंबर उघड करू नका.


























































