
दररोज चालणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे, परंतु कधी कधी चालताना अचानक दम लागतो. अशावेळी चालायचे थांबवा आणि आराम करा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. घाबरल्याने त्रास वाढू शकतो. हळू आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. श्वास लागणे हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
नियमितपणे हलका व्यायाम केल्याने तुमची शारीरिक क्षमता वाढते आणि दम लागणे कमी होऊ शकते. वजन नियंत्रणात ठेवा. धूळ, धूर किंवा इतर अॅलर्जी निर्माण करणाऱया गोष्टींपासून दूर राहा. शरीराला आराम मिळण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. पौष्टिक आणि समतोल आहार घ्या.




























































