
- धकाधकीच्या जीवनात डायबिटीज रुग्णांनी रक्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवणे अवघड आहे. परंतु रक्तातील साखर वाढण्याआधीच ती कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक आहे.
- जर डायबिटीज रुग्णाची रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर गेली आहे, असे वाटत असेल तर सर्वात आधी रक्तातील साखरेची तपासणी करा. त्यासाठी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
- रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास किंवा कमी असल्यास (हायपोग्लायसेमिया), त्वरित डॉक्टराचा सल्ला घ्या. डॉक्टर जे काही सांगतात त्याचे व्यवस्थित पालन करा.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तुमच्या आहारात चणे, बिया, सफरचंद आणि उकडलेली अंडी यांसारख्या पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत होईल.
- नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे. नियमित व्यायामाच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. चांगली झोप रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.




























































