
पेट्रोल पंपावर फसवणूक झाल्याची शंका आल्यास लगेचच पेट्रोल पंप मॅनेजरला भेटून घटनेची माहिती द्या आणि मशीन तपासण्याची मागणी करा.
तुम्ही भरलेले इंधन, रक्कम आणि वेळ असलेली अधिकृत पावती आवर्जून घ्या. कारण तक्रार करण्यासाठी ही बिल/पावती सर्वात मोठा पुरावा असते.
तुमचा गैरसमज किंवा फसवणूक झाल्याचे वाटल्यास, पंपावर असलेल्या पाच लिटरच्या प्रमाणित मापकाद्वारे इंधनाची मात्रा तपासून दाखवण्यास सांगा.
इंधन भरलेल्या पंपनीच्या (उदा. आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल) टोल-फ्री क्रमांकावर किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवा.
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन किंवा पेंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या ऑटोमेशन पोर्टल/पीजी पोर्टल (pgportal.gov.in) वर
ऑनलाईन तक्रार दाखल करा.




























































