
जन्म आणि मृत्यूपत्राची नोंद असणे हे अत्यंत गरजेचे आहे. आई-वडील किंवा घरातील कोणत्याही सदस्यांचे मृत्यू प्रमाणपत्र हरवले तर काय कराल.
सर्वात आधी जर मृत्यू प्रमाणपत्र हरवले तर तुम्ही राहत असलेल्या जवळच्या नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधा. यामध्ये स्थानिक नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा वॉर्ड कार्यालय असू शकते.
मृत्यू प्रमाणपत्रासाठी संबंधित कार्यालयात जाऊन रीतसर एक अर्ज सादर करा. अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
स्थानिक नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा वॉर्ड कार्यालयाने ठरवलेले शुल्क भरा. त्यानंतर तुम्हाला कार्यालयाकडून मृत्यू प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत मिळू शकते.
जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा, 1969 नुसार मृत्यूच्या 21 दिवसांच्या आत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. सरकारी पोर्टलवरूनही मृत्यू प्रमाणपत्र मिळवता येऊ शकते.