
तुमच्या हातात असलेला स्मार्टफोन हॅक होणे आता नवीन राहिले नाही. देशभरात अनेकांचे फोन हॅक करण्यात आले आहेत.
जर स्मार्टफोनची अचानक नेहमीपेक्षा जास्त वेगाने बॅटरी आणि डेटा संपत असेल तर ही फोन हॅक होण्याची लक्षणे आहेत.
जर फोन हॅक झाल्याचा संशय आल्यास तत्काळ फोनचा पासवर्ड बदला. फोनमधील संशयास्पद अॅप्स व फाईल्स असेल तर अनइन्स्टॉल करा.
ई-मेल आणि सोशल मीडियासह सर्व ऑनलाईन अकाऊंटचे पासवर्ड बदलून ते नवीन मजबूत पासवर्ड तयार करा.
जर हे सर्व करूनही तुमच्या मनात कोणती शंका असेल तर फोनला एकदा रिसेट करा. फोनचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.