
इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षित असण्यासाठी त्यावर योग्य प्रमाणपत्र असणे गरजेचे असते. यासाठी पंपलसरी रेजिस्ट्रेशन स्कीम म्हणजेच सीआरएस नंबर देण्यात येतो.
मोबाईल चार्जर, इअरफोन, पावर बँक, लॅपटॉप असे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घेताना केवळ किंमत किंवा ब्रँड न पाहता, त्यावर सीआरएस मार्क आहे का बघा.
यामुळे शॉर्ट सर्किट, गरम होणे, बॅटरी फुगणे किंवा फुटणे, करंट लागणे अशा धोक्यांचा धोका कमी होतो. सीएसआर मार्क नसेल तर युजर्ससाठी घातक ठरू शकते.
इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बॉक्सवर किंवा डिव्हाइसच्या मागील बाजूस बीएसआय लोगो आणि सीआरएस नोंदणी क्रमांक दिलेला असतो. तो बीआयएसच्या अधिकृत वेबसाइटवर तपासता येतो.
सीआरएस क्रमांक नसेल तर अशी उपकरणे घेऊ नका. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. थोडीशी जागरुकता दाखवणे केव्हाही चांगले.


























































