
कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचे असो की नोकरीसाठी अर्ज भरायचा असो, सर्व काही ऑनलाईन आहे. सरकारी कामासाठीसुद्धा आता ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो.
जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असाल आणि तो फॉर्म सबमिट होत नसेल तर काय करावे हे अनेकांना कळत नाही. अशा वेळी काही गोष्टी आहेत, त्या जाणीवपूर्वक करा.
सर्वात आधी फॉर्ममधील सर्व आवश्यक गोष्टी भरल्या आहेत का ते तपासा. मेसेजनुसार माहिती दुरुस्त करा आणि फॉर्म सबमिट करा.
फॉर्म भरताना अडचण येत असेल तर क्रोमऐवजी फायरफॉक्स किंवा एज गुगल सर्च वापरा किंवा मोबाईलऐवजी फॉर्म लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून भरा.
कधी कधी सर्व्हर डाऊन असल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे फॉर्म सबमिट होत नाही. त्यामुळे पुनः पुन्हा फॉर्म सबमिट करायचा प्रयत्न करा.

























































