असं झालं तर… आरोग्य विमा नाकारण्यात आला तर…

  • मेडिक्लेम नाकारण्यात आला तर कंपनीकडून दाव्याच्या नकाराचे कारण लेखी मागा. अनेकदा पॉलिसीमध्ये नमूद नसलेला आजार किंवा प्रीमियम वेळेवर न भरणे अशी कारणे असतात.
  • योग्य कागदपत्रे जमा करणे आणि पॉलिसीच्या अटी व शर्तींचे पालन करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून भविष्यकाळात दावा नाकारला जाणार नाही.
  • रुग्णालयाची कागदपत्रे, डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन आदी व्यवस्थित जमा करा. सर्व पुरावे नीट गोळा करा. विमा कंपनीच्या अंतर्गत तक्रार निवारण प्रणालीकडे तक्रार दाखल करू शकता.
  • विमा कंपनीने दाव्याचा अर्ज नाकारल्यास तुम्ही ग्राहक मंचात तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला एका वकिलाची मदत घ्यावी लागेल.
  • विमा कायदा, 1938 च्या कलम 45 नुसार, जर तुमची पॉलिसी सलग 3 वर्षे चालू असेल तर विमा कंपनी काही प्रमुख कारणांशिवाय (उदा. चुकीची माहिती) दावा नाकारू शकत नाही.