असं झालं तर… पॅनकार्ड हरवले तर…

1 आधारकार्डप्रमाणे पॅनकार्डसुद्धा अतिशय महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. शासकीय आणि खासगी कामांसाठी पॅनकार्डचा वापर केला जातो.

2 जर चुपून पॅनकार्ड गहाळ झाल्यास किंवा हरवल्यास नवीन पॅनकार्डसाठी प्रयत्न करा. पॅनकार्ड हरवले म्हणून फार चिंता करण्याची आवश्यकता नाही.

3 जर तुमच्याकडे ई-पॅनकार्ड असेल तर ते फिजिकल पॅनकार्ड म्हणून उपयोगी पडते. ई-पॅन कार्डवरून सर्व कामे आरामात होऊ शकतात.

4 जर तुम्हाला ई-पॅन कार्ड डाऊनलोड करायचे असेल तर ते एनएसडीएलच्या अधिपृत पोर्टलवर जाऊन कार्ड डाऊनलोड करू शकता.

5 नवीन पॅनकार्डसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. प्रोसेसिंग फी म्हणून किरकोळ रक्कम भरावी लागेल. डाऊनलोड ई-पॅनवर क्लिक करून पॅनकार्ड मिळवा.