
प्रवासादरम्यान मळमळ किंवा उलटय़ा होण्याची समस्या अनेकांना उद्भवते. घरातील चार सदस्यांपैकी एका सदस्याला ही समस्या असते. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी आणि प्रवासादरम्यान आल्याचे लहान तुकडे किंवा आल्याचे पँडी चघळल्याने मळमळ कमी होते. लिंबू पाणी किंवा लिंबू सरबताने आराम मिळतो.
प्रवासात वेलची खाणे फायदेशीर ठरते. बडीशेपदेखील मळमळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. प्रवासादरम्यान बडीशेप चघळल्याने किंवा बडीशेपचे पाणी प्यायल्याने आराम मिळतो. प्रवासाला निघण्यापूर्वी हलके आणि सहज पचणारे अन्न खा. जास्त मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्यास उलटीची शक्यता असते.































































