बँक खाते ब्लॉक झाले तर…

बँक खाते ब्लॉक किंवा फ्रीझ झाले तर काय करावे हे अनेकांना समजत नाही. तुमच्या बाबतीत जर असे काही झाले तर सर्वात आधी बँकेशी संपर्क साधा. शक्य असेल तर बँकेच्या शाखेत जा.

बँक खाते कशामुळे ब्लॉक झाले आहे याची माहिती घ्या. केवायसी अपडेट नसणे, कर्जाची थकबाकी, फसवणुकीचा संशय, आयकर विभागाचा आदेश किंवा अन्य काही कारणे असू शकतात.

बँकेच्या तपासणीत सहकार्य करा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सल्लागाराची मदत घ्या. समस्या सुटेपर्यंत बँक अधिकाऱयांच्या संपका&त राहा. कोणताही वादग्रस्त निर्णय घेऊ नका.

बँक खाते फ्रीझ झाल्यानंतर खात्यातून पैसे काढता येत नाही किंवा मोबाइलवरून पैसे ट्रान्सफर करता येत नाही. ऑटोमेटिक पेमेंट थांबवले जातात.

खाते ब्लॉक केल्यानंतरही तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम पाहू शकतात. खात्यात पैसेही जमा होऊ शकतात. फक्त पैसे काढता येत नाहीत.