असं झालं तर… पॅनकार्ड हरवल्यास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमचे पॅनकार्ड उपलब्ध नसेल किंवा हरवले असेल तर तुम्ही त्यासाठी पुन्हा अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करून तुम्ही डुप्लिकेट पॅनकार्ड सहज शोधू शकता.

NSDL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथे तुम्हाला तुमचा पॅनकार्ड क्रमांक, 10 अंकी आधार क्रमांक आणि जन्म तारीख टाकावी लागेल.

अटी आणि शर्ती मान्य करा. कॅप्चा पूर्ण करा आणि सबमिट करा. तुमच्या पॅनकार्डचे तपशील स्क्रीनवर दिसतील. त्याप्रमाणे तपासून घ्या.

पुढे जाण्यासाठी तुम्हाला नवीन पॅनकार्डची ऑर्डर द्यावी लागेल आणि तुमचा पिन नंबर टाकावा लागेल. तुमचा पत्ता पडताळून 50 रुपये फी भरा.

या पायऱ्या पूर्ण केल्यानंतर तुमचे डुप्लिकेट पॅनकार्ड काही दिवसांतच तुमच्या रजिस्टर्ड पत्त्यावर पोहोचेल. अशा प्रकारे घरबसल्या डिजिटल पॅनकार्ड मिळवू शकता.