दात दुखत असेल तर… हे करून पहा

काही वेळा अचानक दाताला ठणक लागते. दातदुखी असह्य होते. दातदुखीवर काही घरगुती उपाय आहेत. गरम पाण्यात मीठ टापून गुळण्या करा. यामुळे वेदना कमी होतात आणि तोंडातील बॅक्टेरियादेखील कमी होतात. दात जास्त दुखत असेल तर दाताखाली एक लवंग ठेवा. यामुळे दातदुखी कमी होते.

थोडेसे मीठ आणि चार थेंब मोहरीचे तेल एकत्र करून दुखणाऱ्या दातावर व हिरडय़ांवर चोळा. दातदुखीमुळे जास्त वेदना होत असल्यास दाताच्या बाहेरचा भाग बर्फाच्या तुकडय़ांनी दुखणाऱ्या भागावर शेकल्याने वेदना कमी होतात. यासोबतच पुदिन्याची पाने चघळल्याने किंवा पुदिना चहा पिल्याने आराम मिळतो. लसणाच्या पाकळ्या ठेचून दुखऱ्या दातावर लावा.