असं झालं तर…फोनमधील फोटो डिलीट झाले तर…

स्मार्टफोनमध्ये जुने फोटो अचानक डिलीट झाले तर काय कराल. गुगल फोटोजचा बॅकअप सुरू ठेवायला विसरू नका. त्यामुळे फोटो सेव्ह राहतात. 

फोटो डिलीट झाले तर ते ‘ट्रॅश’ फोल्डरमध्ये 60 दिवसांसाठी (बॅकअप घेतलेल्या फोटोसाठी) किंवा बॅकअप नसलेल्या फोटोसाठी 30 दिवसांसाठी
उपलब्ध राहतील.

‘गुगल फोटोज’ अॅप उघडा, ‘लायब्ररी’वर टॅप करा आणि नंतर ‘ट्रॅश’मध्ये जा. तेथे तुम्हाला तुमचे डिलीट केलेले फोटो सापडतील आणि तुम्ही ते रिस्टोअर करू शकता.

जर फोटो ‘ट्रश’मध्ये नसतील, तर तुम्ही डेटा रिकव्हरी अॅप्सचा वापर करू शकता, असे अॅप्स हे गुगल प्लेवर उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून तुम्ही फोटो मिळवू शकता.

काही वेळा फोटो गहाळ होण्याचे कारण स्टोरेजची कमतरता किंवा व्हायरस असू शकते. अशा वेळी तुम्ही गॅलरी किंवा इतर स्टोरेज फोल्डर तपासा.