राष्ट्राच्या हिताचे जे असेल तेच करू! अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसमोर हिंदुस्थानची भूमिका

16

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केली जात असलेल्या रशियासह अन्य देशांसोबत करार करताना जे राष्ट्राच्या हिताचे असेल तेच हिंदुस्थान करेल, असे जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना ठामपणे सांगितले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ हे तीन दिवसांच्या दौर्‍यासाठी बुधवारी हिंदुस्थानात दाखल झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. हिंदुस्थान-अमेरिका रणनीती भागीदारी बळकट करण्याच्या दृष्टीने दोघांमध्ये चर्चा झाली. मोदींनी व्यापार आणि अर्थव्यवस्था, ऊर्जा, संरक्षण, दहशतवादाविरोधात लढा या बाबींच्या माध्यमातून अमेरिका व हिंदुस्थानातील संबंध भक्कम करण्यासाठी इच्छा व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या