व्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…

64

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगभरातील युझर्ससाठी व्हॉट्सअॅप (whatsapp) नेहमीच नवनवीन कल्पना लढवते आणि वेगवेगळे फिचर्स आणत असते. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपने अॅपमध्ये बदल करत चार नवीन फिचर्स त्यामध्ये समाविष्ट केले आहेत. सध्या हे नवीन फिचर्स फक्त आयओएस (iOS) अॅप वापरणाऱ्यांसाठी असणार आहे. याचा वापर आयफोन एक्सआर, आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सवर करता येणार आहे. यानंतर काही महिन्यात हे फिचर्स अँड्रॉईड युझर्ससाठी लागू करण्यात येईल.

– व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचर्सनुसार आयओएस (iOS) युझर कोणत्याही अन्य आयओएस (iOS) युझरला सतत ऑडिओ मेसेज पाठवत असेल तर युझर त्या मेसेजला टॅप केल्याविना तो ऐकू शकणार आहे. यापूर्वी युझरला प्रत्येक मेसेज टॅप करून ऐकावा लागत होता, आता त्याची आवश्यकता असणार नाही.

– यासह व्हॉट्सअॅपने बबल अॅक्शन मेन्यूमध्ये एक नवीन फिचर समाविष्ट केले आहे. या नवीन फिचरअंतर्गत बबल मेन्यू पॉपअप अधिक वेळ दिसणार आहे. यात डिलीट, रिप्लाय, फॉरवर्ड, स्टार, कॉपी आणि इतर ऑप्शन असणार आहेत. व्हॉट्सअॅपने हे रि-डिझाईन केले असून यामुळे मेसेज पाठवण्यास आणि स्वीकारण्यास अधिक गती मिळणार आहे.

– तिसरे फिचर हे स्टेटसशी संबंधीत असून यामुळे स्टेटसला रिप्लाय देण्याचे नवीन पर्याय युझरला मिळणार आहेत. याआधी स्टेटसला टेक्स मेसेज, इमेज, जीआयएफ इमेज आणि व्हिडीओच्या मदतीने रिप्लाय देता येत होता, परंतु आता नवीन फिचरमुळे व्हाईस मेसेज, लोकेशन, डॉक्यूमेंट आणि व्हीकार्डच्या मदतीने रिप्लाय देता येणार आहे. विशेष म्हणजे हे फिचर अॅड्रॉईडमध्येही उपलब्ध असणार आहे.

– व्हॉट्सअॅपने आणखी एक नवीन फिचर समाविष्ट केले आहे. व्हॉट्सअॅपचे 2.18.100 या व्हर्जनमध्ये व्हिडीओ प्रिव्ह्यू ऑप्शन नोटिफिकेशन पॅनल देण्यात आले आहे. सध्या हे फिचर पुढील काही काळात अॅक्टिव्ह होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या