WhatsApp वर फोटोंसाठी लवकरच येणार नवं फिचर

WhatsApp डिसअपीयरिंग फोटोज फीचरचं टेस्टिंग करत आहे. रिपोर्टनुसार, लवकरच हे फिचर अपडेट करून सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येईल. व्हॉट्सअॅपवर आधीपासूनच डिसअपीयरिंग मेसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

WaBetaInfo ने या फिचरचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यावरून कळतं की, रिसीव्हर फोटो पाहून चॅट बंद करेल, तसा फोटोही गायब होईल.

स्क्रीनशॉट हे कळतं आहे की डिसअपीयरिंग फोटो सेंड करण्यासाठी तुम्हाला गॅलेरीतून फोटो सिलेक्ट करावा लागेल. एकदा फोटो सिलेक्ट केल्यावर तुम्हाला घड्याळासारखा आयकन दिसेल. त्यावर क्लिक करावं लागेल. फोटो सेंड करताना ‘एड अ कॅप्शन’ जवळ आयकन दिसेल. यानंतर तुम्ही कोणत्याही कॉन्टॅक्टला डिसअपीयरिंग फोटो पाठवू शकतात.

व्हॉट्सअॅपचं हे नवं डिसअपीयरिंग फोटो फीचर इंस्टाग्रामसारखं काम करेल. इंस्टाग्राम मध्ये देखील सेल्फ-डिस्ट्रक्टिंग फोटोचं एक फीचर आहे. WaBetaInfo ने हे देखील म्हटलं आहे की यूझर्स व्हॉट्सअॅपमध्ये डिसअपीयरिंग फोटोजला एक्पोर्ट किंवा सेव्ह करू शकणार नाहीत.

अगदी सरळ शब्दात सांगायचं म्हणजे व्हॉट्सअॅप यूझर्स डिसअपीयरिंग फोटोज ना फोनच्या गॅलरीत सेव्ह करू शकणार नाही. किंवा कुणाला फॉर्वर्ड करू शकणार नाहीत. सूत्रांनी हे देखील म्हटलं आहे की, कंपनीने या डिसअपीयरिंग फोटोज मध्ये स्क्रीनशॉट डिटेक्शन फिचर दिलेलं नाही.

रिपोर्टनुसार, स्टेबल अपडेटमध्ये स्क्रीनशॉट डिटेक्शन फीचर देता येते. डिसअपीयरिंग फोटोज फिचर iOS आणि एंड्रॉइड दोन्ही प्रकारच्या सेवा देणाऱ्या मोबाइलवर वापरता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या