
व्हॉट्सअॅप लवकरच एक भन्नाट फीचर घेऊन येणार आहे. यामुळे युजर्सना फोटो आणि व्हिडीओसह पाठवण्यात आलेले कॅप्शन्सदेखील फॉरवर्ड करता येणार आहेत. या नव्या फीचरमुळे युजर्सना कंटेन्ट फॉरवर्ड करणे अधिक सोपे होईल. सध्या फोटो किंवा व्हिडीओबरोबर पाठवण्यात आलेले कॅप्शन फॉरवर्ड करता येत नाहीत. तुम्ही जर फॉरवर्ड करण्यात आलेला फोटो किंवा व्हिडीओ फॉरवर्ड केला तर फक्त तो फोटो आणि व्हिडीओ फॉरवर्ड होतो, त्यासह कॅप्शनमध्ये देण्यात आलेली माहिती किंवा टेक्स्ट मेसेज फॉरवर्ड होत नाही, पण व्हॉटसअॅपच्या या नव्या फीचरमुळे कॅप्शनसह मीडिया फाइल्स फॉरवर्ड करता येतील. सध्या या फीचरवर काम सुरू आहे आणि लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

























































