15 मेपूर्वी ‘हे’ काम न केल्यास WhatsApp होईल बंद…

व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा आपली प्रायव्हसी पॉलिसी तयारी केली आहे. लवकरच नवीन पॉलिसीची गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे. मागील वादाचा विचार करता कंपनीने यावेळी पूर्ण काळजी घेतली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन पॉलिसीत युजर्सना पूर्ण समाधानी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे म्हणणे आहे की, ‘युजर्सच्या गोपनीयतेचा अधिकार पूर्णपणे कायम ठेवण्यात आला आहे. युजर्सच्या संमतीशिवाय त्याचा डेटा कोणालाही देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण लोकांच्या वैयक्तिक चॅट्स Encrypted स्वरूपात आहेत. जी व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकची कोणतीही थर्ड पार्टी पाहू शकत नाही.’

यावर्षी जानेवारीत आलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फोन मॉडेल, लोकेशन माहिती, फेसबुकच्या मालकीच्या कंपन्या मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि थर्ड पार्टीसह वैयक्तिक माहिती सामायिक करण्यासह वापरकर्त्याच्या डेटावर चर्चा झाली. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसीला मान्यता देण्याची अंतिम मुदतही निश्चित केली आहे. या नवीन प्रायव्हसी पॉलिसीनुसार युजर्सने 15 मे पर्यंत नवीन प्रायव्हसी पॉलिसी मंजूर न केल्यास त्यांची व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद केली जाऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या