गोपनीयतेची एवढी चिंता वाटत असेल तर Whatsapp वापरू नका! ‘गुगल मॅप’ही तुमचा डेटा शेअर करते

व्हॉटस् अॅप हे खासगी अॅप आहे. गोपनीयतेची एवढी चिंता वाटत असेल, तर व्हॉटस् अॅप वापरू नका, अशी सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने नागरिकांना केली आहे. ‘गुगल मॅप’ही तुमचा सर्व डेटा साठवतो आणि शेअर करतो याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

व्हॉटस् अॅपचे नवीन प्रायव्हसी धोरण फेब्रुवारीत येणार होते; पण आता मेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. व्हॉटस् अॅप या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्सच्या गोपनीयतेचा भंग होतो. त्यामुळे केंद्र सरकारने व्हॉटस् अॅपवर कारवाई करावी, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यावर न्यायमूर्ती संजिव सचदेव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्यायालयाने फेसबुक आणि व्हॉटस् अॅपविरोधात नोटीस बजावण्यास नकार दिला. याप्रकरणी 25 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

  • युजर्सकडून वापरले जाणारे बहुतेक अॅप्स डेटा स्टोअर करतात. तुम्ही ‘गुगल मॅप’ वापरत असाल तरी डेटा शेअर आणि स्टोअर केला जातो.
  • व्हॉटस् अॅप हे खासगी अॅप आहे. ते वापरलेच पाहिजे याची सक्ती नाही. आपल्या डेटाबद्दल एवढीच चिंता वाटत असेल, तर युजर्सनी व्हॉटस् अॅप वापरू नये.
आपली प्रतिक्रिया द्या