2020 नंतर ‘या’ स्मार्टफोन व आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार, तुमचा तर नाही?

68

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगभरामध्ये मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि ऑडीओ पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर कोट्यवधी लोकं करताना दिसतात. परंतु WhatsApp युझर्ससाठी एक मोठी बातमी असून काही अॅड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये पुढच्या वर्षीपासून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. WhatsApp ने फेब्रुवारी 2020 ही डेडलाईन दिली आहे. याआधी विंडोज (Windows) मोबाईल फोनला WhatsApp ने सपोर्ट करणे बंद करण्याची घोषणा केली होती. या वर्षीच्या अखेर विंडोज (Windows) मोबाईल फोनमध्ये WhatsApp ची सेवा बंद होईल.

विंडोज (Windows) प्रमाणेच काही अॅड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये फेब्रुवारी 2020 पासून WhatsApp ची सेवा बंद होणार आहे. WhatsApp ने दिलेल्या माहितीनुसार, 2.3.7 व्हर्जनच्या अॅड्रॉईड स्मार्टफोन्स युझर्स आणि iOS 7 वर चालणाऱ्या iPhone यूझर्सला फेब्रवारी 2020 पासून WhatsApp सपोर्ट करणे बंद करणार आहे.

WhatsApp च्या मते या निर्णयाचा प्रभाव जास्त युझर्सवर पडणार नाही. जे लोक खूपच जुने अॅड्रॉईड स्मार्टफोन्स आणि आयफोन्स वापर करत आहेत त्यांच्यावरच याचा प्रभाव पडणार आहे. कारण सध्या अनेक लोक नवीन स्मार्टफोन्स वापरत आहेत आणि यामध्ये कंपनीकडून सॉफ्टवेअर अपडेट्स वेळोवेळी दिले जातात. त्यामुळे त्यांना याचा तोटा होणार नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे की, 4.0.3 किंवा त्यापेक्षा जास्त व्हर्जनचे स्मार्टफोन्स वापरा. तसेच iOS 8 पेक्षा वरचे व्हर्जन वापरणाऱ्या आयफोन युझर्सला व्हॉट्सअॅपच्या निर्णयाचा तोटा होणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या