स्टेटससाठी आता व्हाट्सअॅप आणणार नवे फिचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हाट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी स्टेटस फिचरला आणखी स्मार्ट आणि पर्सनल बनवण्याची तयारी केली आहे. सध्या स्टेटस शेअर करण्यासाठी यूजर्सकडे तीन ऑप्शन आहेत. यातील पहिला पर्याय आहे माय कॉन्टॅक्ट्स, माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट आणि ओन्ली शेअर विथ असे हे तीन पर्याय दिसतात. परंतु व्हाट्सअॅप लवकरच नवीन अपडेटमध्ये कस्टम्स लिस्टचे फिचर आणणार आहे. या नव्या फिचरमुळे यूजर्सला प्रत्येक स्टेटससाठी वेगवेगळ्या लोकांची यादी बनवण्याची संधी मिळणार आहे. याचाच अर्थ कोणालाही ब्लॉक न करता स्टेटस कोणी पाहावे आणि कोणी पाहू नये, हे ठरवता येणार आहे. या फिचरच्या मदतीने यूजर्सला कुटुंब, मित्र, ऑफिस आणि सहकायांसाठी वेगवेगळे स्टेटस शेअर करता येतील. याचा सर्वात फायदा म्हणजे कुटुंबासंबंधित स्टेटस हे केवळ घरातील सदस्यांना दिसेल. तर ऑफिससंबंधित अपडेट हे केवळ ऑफिसमधील सहकाऱयांना दिसेल.