राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. छत्रपती शिवरायांचा दुर्घटनाग्रस्त पुतळा पाहण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे मालवण येथे गेले असताना नारायण राणे आणि त्याच्या पिलावळीने उन्माद माजवला. स्थानिक शिवसैनिकांना धमक्या दिल्या, पोलिसांशी अरेरावी केली, या विरोधात गुरुवारी शहरात शिवसेनेने उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली ‘राणेला जोडे मारा’ आंदोलन केले. ‘चाराणे, बाराणे अटक करा राणे’ घोषणा देत शिवसैनिकांनी राणे पिलावळीला चपलांचा हार घातला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘सिंधुदुर्ग ही राणेंच्या बापाची संपत्ती नसून अखंड महाराष्ट्राची संपत्ती आहे, हा अडविणारा कोण? फडणवीस हेच अशा गुंडप्रवृत्ती महाराष्ट्रात वाढविण्यास खतपाणी देतात का? नारायण राणे यांना तत्काळ अटक न झाल्यास महाराष्ट्रासमोर खोट्या गृहमंत्र्यांचा चेहरा लवकरच समोर येईल’, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, संघटक वसंत मोरे, सहसंपर्कप्रमुख प्रशांत बधे, आनंद गोयल, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, अनंत घरत, किशोर रजपूत, विलास सोनवणे, संतोष गोपाळ, महिला जिल्हा समन्वयक कल्पना थोरवे, शहर संघटिका पल्लवी जावळे, विशाल धनवडे, संजय भोसले, सचिन भगत, सागर माळकर, युवासेना शहर अधिकारी सनी गवते, युवराज पारीख, चेतन चव्हाण, नीलेश जठार, राजेश मोरे, प्रसाद काकडे, चंदन साळुंखे, नागेश खडके, नंदू येवले, तेजस मर्चेंट, अजित जाधव, दिलीप पोमाण, मारुती ननावरे, महिला आघाडीच्या अमृत पठारे, रोहिणी कोल्हाल, सुनीता खंडाळकर, ज्योती चांदोरे, सोनाली जुनवणे, शीतल जाधव, करुणा घाडगे, निकिता मारटकर, प्रवीण भोर, वैशाली बनशेत, नितीन दलभंजन, संतोष भूतकर, मुकुंद चव्हाण, अजय भुवड, निखिल खांदवे, अजय वाल्हेकर, श्रीकांत खांदवे, जानू आखाडे, राहुल शेडगे, हेमंत यादव, हरिश्चंद्र सपकाळ, सूर्यकांत पवार, अमोल निकुडे, गणेश खलाटे, संजय गवळी, गोविंद निंबाळकर, नाना मरळ, नितीन रावळेकर, विलास नावाडकर, ऋषिकेश चव्हाण व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.