असं झालं तर… जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवे दागिने करताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने बनवण्यासाठी सराफाच्या दुकानात जुने सोने विकून त्याचे पैसे नवीन दागिन्यांच्या खरेदीसाठी वापरले जातात.

जुने सोने वितळवून नवीन डिझाइनचे दागिने घडवून घेतले जातात. या प्रक्रियेत जुन्या सोन्याचे वजन, शुद्धता आणि त्या दिवसाचा सोन्याचा दर यानुसार त्याचे मूल्य ठरवले जाते.

जुने दागिने वितळवताना किंवा बदली करताना सराफ काही टक्के (साधारणपणे 5 ते 10 टक्के) घट किंवा शुद्धतेचे नुकसान गृहीत धरून सोन्याचे मूल्य ठरवतात.

तुम्ही जुने दागिने विकणार असाल तर तुम्हाला त्याचे वजन आणि पॅरेटची योग्य माहिती असली पाहिजे. याशिवाय दागिन्यांचे मूळ बिल तुमच्याकडे ठेवा.

जुन्या दागिन्यांवर ‘बीएसआय’ हॉलमार्क असेल तर त्यांचे अचूक मूल्य मिळण्यास मदत होते. नवीन दागिने बनवताना  घडणावळ शुल्क किती लागेल ते विचारा.