
आयपीएल 2026 या हंगामातील सलग तीनवेळा मैदान मारलेल्या पंजाब किंग्ज संघातील खेळाडू युझवेंद्र चहल त्याच्या जबरदस्त खेळामुळे चर्चेत आहे. मात्र आता खेळासोबत त्याचे वैयक्तिक आयुष्य चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री आणि मॉडेल तानिया चॅटर्जीने चहलबाबत धक्कादायक दावे केले आहेत. तानियाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये चहलने तिला इन्स्टाग्रामवर मेसेज केल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये तानिया कॅमेऱ्यासमोर तिचा फोन धरून चहलसोबतचे चॅट दाखवताना दिसत आहे, ज्यामुळे नेटिझन्समध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
तानियाने पापरझींसमोर युझवेंद्रने तिला मॅसेज केल्याचे सांगितले. या मेसेजमध्ये युझवेंद्रने तानियाला Cute असा मॅसेज पाठवसा आहे. हे मेसेज तानियाने कॅमेऱ्यासमोर दाखवले. चहलचा हा मेसेज दाखवताना मला अनेक जण क्यूट बोलतात ही फार काही मोठी गोष्ट नाही, असे ती म्हणाली.तानियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
तानियाने ही घटना साध्या पद्धतीने मांडली असली, तरी सोशल मीडियावर यावरून युझवेंद्र चहलला प्रचंड ट्रोल केले जात आहे. काही युझर्सनी चहलचे वागणं अयोग्य असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तानियाने अशा खासगी संवादाचा व्हिडिओ सार्वजनिक केल्याबद्दल तिच्यावर टीका केली आहे. या घटनेमुळे इंटरनेटवर चहलच्या नावाचा ट्रेंड सुरू झाला असून लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर युझवेंद्र चहलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोण आहे तानिया चॅटर्जी?
कोण आहे तानिया चॅटर्जी तानिया चॅटर्जी ही (30) कोलकाता, पश्चिम बंगाल येथील अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तानियाने 2020 मध्ये मनोरंजनविश्वात पदार्पण केले. तानिया चॅटर्जी ने ‘गंदी बात’, ‘फ्लॅटमेट’ आणि ‘कसक’, यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.



























































