युकेमधील एका व्यावसायिकाने अॅपल कंपनीविरोधात दावा ठोकला आहे. या व्यावसायिकाने आपल्या आयफोनवरून सेक्स वर्करला मेसेज पाठवले होते आणि नंतर पर्मनंट डिलीट केले होते. मात्र तरीही ते मेसेज पत्नीला फॅमिली आयमॅक डिव्हाईसवर मिळाले. त्यामुळे संतापून पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवली. या सगळ्या प्रकाराला अॅपल कंपनी जबाबदार असल्याचा आरोप या व्यावसायिकाने केला आहे.
या व्यावसायिकाने आपले नाव उघड केलेले नाही. त्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आपण कोणतेही मेसेज पर्मनंटली डिलीट करतो, तेव्हा ते आपल्या पह्नमधून पूर्णपणे डिलीट होतात, असाच आपला समज असतो. मात्र मेसेज डिलिट केले तरीही ते आयपह्न आयडीला लिंक असलेल्या सर्व डिव्हाईसवर राहतात, हे अॅपलने सांगितलेले नाही. अॅपलने डिलीट मेसेजसंदर्भातील धोरण स्पष्ट केलेले नाही. सेक्स वर्करला पाठवलेले सगळे मेसेज व्यावसायिकाच्या पत्नीला मिळाले आणि तिने कोर्टात घटस्पह्टासाठी धाव घेतली. घटस्पह्टाच्या खटल्याचा खर्च आणि इतर नुकसानभरपाई असे मिळून पाच दशलक्ष पाऊंडची मागणी व्यावसायिकाने अॅपल कंपनीकडे केली आहे.
घटस्फोटासाठी अॅपल जबाबदार
पती-पत्नीच्या घटस्पह्टासाठी अॅपल जबाबदार आहे, असा दावा या व्यक्तीने केला आहे.
ज्यांना फोन कसा वापरायचा माहिती नाही अशा पुरुषांकडून अॅपल विरोधात सामुहिक खटला दाखल करण्याचा विचार या व्यक्तीने केला आहे.
जर पत्नीला अशा निर्दयपणे मेसेज सापडले नसते तर वेगळ्या मार्गाने, तर्कसंगत संवाद साधून हे लग्न वाचवता येऊ शकले असते.