विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पत्नीकडून पतीचा खून, मुन्नी बाईला अटक

murder

छत्तीसगडमध्ये विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पत्नीने पतीचा खून केला आहे. या घटनेनंतर आरोपी महिला फरार झाली होती. पोलिसांनी कसून तपास करत तिला अटक केली आहे. मुन्नी बाई असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुन्नी बाई आणि किशुन राम हे जशपूरनगर भागात राहत होते. मुन्नी बाई काही कामानिमित्त आपल्या माहेरी गेली होती. रात्री उशीरा ती घरी परतील. घरी आल्यानंतर तिचा नवरा किशुन राम हा घरी नव्हता. तेव्हा ती त्याला शोधायला बाहेर पडली. तेव्हा तो शेजारच्या घरात झोपला होता.

तेव्हा मुन्नी बाईला आपल्या नवर्‍यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आला. तेव्हा लोखंडी रॉडने मुन्नी बाईने त्याला मारहाण केली. त्यात किशुन राम गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुन्नीबाई घटनेनंतर फरार झाली. पोलिसांनी कसून तपास करत तिचा शोध घेतला आणि तिला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या