
तोंडावर ओढणी बांधून ती पुण्याच्या मेडिकल स्टोअरमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. जोराचा वारा आल्याने ओढणी उडाली आणि दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तिला ओळखले. तसेच क्षणाचाही विलंब न लावता ताब्यातही घेतले. ताब्यात घेतलेल्या या महिलेने आपल्या दिवसांपूर्वीच हत्या केली होती. या खुनी महिलेचे नाव चमनदेवी असे असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे.
प्रियकराच्या मदतीने क्राईम पतीची काही नालासोपाऱ्याच्या धानीवबाग येथील ओम साई वेल्फेअर सोसायटीमध्ये राहणाऱ्या चमनदेवी या महिलेने आपला प्रियकर मोनू शर्मा याच्या मदतीने पती विजय चौहान याची हत्या केली होती. एवढेच नव्हे तर त्याचा मृतदेह घरातच पुरून त्यावर टाईल्स लावल्या. या हत्याकांडानंतर चमनदेवी ही 19 जुलै रोजी पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन प्रियकरासह पुण्याला पळून गेली होती. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करीत पुण्याला जाऊन खुनी चमनदेवीला पकडले.





























































