पक्ष सोडण्याबाबत एकनाथ खडसे यांनी दिली प्रतिक्रिया, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरला मी माझ्या कामासाठी आलेलो आहे, काल मी शरद पवारांची भेट घेतली नाही असे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसेच पक्ष सोडण्याचा कुठलाच विचार नाही असेही खडसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये झालेल्या सभेत एकनाथ खडसे यांनी आपली खदखद व्यक्त केली होती. तेव्हापासून एकनाथ खडसे हे दुसर्‍या पक्षात जातील का अशा चर्चा सुरू होत्या. आपण भाजप सोडणार नाही असे सांगून खडसे यांनी पक्ष सोडण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसेच काल शरद पवारांची भेट घेतली नाही असे सांगितले. नागपूरमध्ये विधानसभेत कामानिमित्त आलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचीही भेट घेऊ असेही खडसे म्हणाले.

वरिष्ठांनी मन मिळवण्याचा प्रयत्न झाला का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर खडसे म्हणाले की मी कुठलाही निर्णय घेतला नाही त्यामुळे मन वळवण्याचा प्रश्नच येत नाही.