थंडीत नितळ कांती मिळविण्यासाठी करा हे घरगुती उपाय

थंडीत त्वचा कोरडी पडत असल्यामुळे अनेकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी घरच्या घरी काही उपाय करून आपण पुन्हा नेहमीसारखी नितळ कांती मिळवू शकतो.

नाक व कपाळावरची रुक्ष त्वचा – अनेकांना नाक व कपाळावरची त्वचा रुक्ष होण्याचा त्रास होतो. अशावेळी दररोज रात्री थोडे खोबरेल तेल किंवा राईचे तेल लावून झोपावे. त्वचेतला कोरडेपणा कमी होतो.

ऑलिव्ह ऑईल व साखरेचा स्क्रब वापरा – अर्धा कप साखर व दोन टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल एकत्र करा. त्यात तुम्ही व्हिटॅमिन ऑईल देखील अॅड करू शकता. या स्क्रबने चेहऱ्यावर मसाज करा. याने चेहऱ्याला तुकतुकी येईल.

दररोज दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्या. याने त्वचेतील ओलावा कायम राहिल.

– कच्च दूध चेहऱ्याला लावा व दहा मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. याने त्वचा मॉयश्चराईज होईल. मात्र असे दिवसातून दोनदा करा.

– दहा मिनिटापेक्षा जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका.

– मध चेहऱ्याला लावा. दहा मिनिटे सुकू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. याने त्वचेचा कोरडेपणा कमी होईल.

आपली प्रतिक्रिया द्या