थंडीत त्वचेवर हे प्रयोग करू नका! होऊ शकतं नुकसान

सध्या वातावरण थंड व्हायला सुरुवात झाली आहे. गुलाबी थंडीची चाहूल मनाला आल्हाददायक असली तरी त्वचेसाठी अनेक समस्या घेऊन येऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेवर कोणत्याही प्रसाधनाचा वापर करण्यापूर्वी त्याने काही नुकसान तर होणार नाही ना ते अवश्य तपासा.

जर तुमच्या त्वचेच्या रोजच्या रूटीनमध्ये कोणताही बदल जाणवत नसेल तर त्वचेवर शक्यतो कोणतेही प्रयोग करू नका. कारण जेव्हा आवश्यकता असते, तेव्हाच तुम्हाल त्वचेत बदल दिसतात. त्यामुळे रूटीन कायम ठेवा. तसंच पुढील काही प्रसाधनांचा वापर टाळा. त्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकतं.

1. तीव्र गंध असलेली प्रसाधने

तुम्हाला एखाद्या प्रसाधनाचा सुगंध आवडत असेल तर तुम्ही ते प्रसाधन आवर्जून वापरता. पण थंडीत तापमान कमी झाल्यानंतर हा तीव्र सुगंध तुमच्या त्वचेच्या जळजळीला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे अशा प्रकारची प्रसाधने जपून वापरा.

2. साबण

सकाळी आंघोळ करताना किंवा इतर वेळी चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर करू नका. त्याने तुमच्या त्वचेचा पीएच स्तर बिघडतो आणि त्वचा कोरडी होऊ लागते. चेहऱ्या धुण्यासाठी शक्यतो सोप फ्री फेसवॉश किंवा क्लिन्जर वापरा

3. फेसमास्क

अनेकांना चेहऱ्यावर नैसर्गिक किंवा विकतचा मास्क लावण्याची सवय असते. पण, असे फेसमास्क उन्हाळ्यात उपयुक्त असता. मुलतानी मातीसारखा फेसपॅक जर कुणी हिवाळ्यात लावला तर त्वचेवरचा तेलाचा थर निघून जातो आणि त्वचा कोरडी होते.

4. स्क्रबिंग

चेहऱ्याच्या सफाईत स्क्रबिंग हा भाग असतो. छोटे रवाळ कण चेहऱ्याची मृतत्वचा काढून टाकण्यासाठी लाभदायक असतात. पण, थंडीत याचा वापर केल्याने त्वचेचं नुकसान होतं. त्यामुळे स्क्रबिंग शक्यतो टाळा. किंवा घरगुती पदार्थ वापरून स्क्रबिंग करा.

5. अल्कोहोल बेस्ड टोनर्स

त्वचेची सफाई केल्यानंतर तिची छिद्रं बंद करण्यासाठी टोनर लावला जातो. त्यात जर अल्कोहोल असेल तर त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे ज्या टोनरमध्ये अल्कोहोल असेल, त्या टोनरचा वापर टाळणंच योग्य ठरेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या