
हिवाळ्यात हवेतला ओलावा कमी होतो, थंड वारे आणि कोरडी हवा यांचा थेट परिणाम त्वचेवर होतो. यावर घरगुती उपाय म्हणजे सौम्य आणि मॉइश्चरायझिंग क्लेन्झर वापरणे फायदेशीर ठरते.
बदाम, अक्रोड, तीळ, जवस, गाजर, हिरव्या पालेभाज्या आणि आवळा यांचा आहारात समावेश केल्यास त्वचा आतून चांगली राहते.
पुरेसे पाणी, कोमट पाणी, सूप, हर्बल चहा घेतल्यास त्वचा आतून हायड्रेट राहते आणि कोरडेपणा उद्भवत नाही. बाहेर जाताना स्कार्फ, हातमोजे आणि पूर्ण बाहीचे कपडे वापरल्यास त्वचा सुरक्षित राहते. चेहऱ्यावर हलके मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावून बाहेर पडा. जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा.


























































