विस्डेन’च्या कसोटी संघात हिंदुस्थानचे दोघेच, विराट, अश्विनला प्रतिष्ठेच्या यादीत स्थान

495

‘विस्डेन’ या क्रीडाशी निगडित असलेल्या मासिकाकडून काही दिवसांपूर्वी दशकातील सर्वोत्तम वन डे संघ जाहीर केल्यानंतर मंगळवारी त्यांच्याकडून दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, विराट कोहली व महेंद्रसिंह धोनी या हिंदुस्थानच्या खेळाडूंना वन डे संघात स्थान देण्यात आले होते. मात्र कसोटी संघात टीम इंडियाच्या दोघांनाच स्थान देण्यात आले आहे. कर्णधार विराट कोहली व ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांना ‘विस्डेन’ने कसोटी संघात स्थान दिले आहे.

‘विस्डेन’कडून निवडण्यात आलेल्या कसोटी संघात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर व स्टीवन स्मिथ यांची निवड करण्यात आली आहे. ऍलिस्टर कूक, जेम्स ऍण्डरसन या इंग्लंडच्या खेळाडूंना यामध्ये स्थान मिळाले आहे. तसेच ए बी डिव्हिलीयर्स, डेल स्टेन व कॅगिसो रबाडा या दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनीही ‘विस्डेन’च्या संघात एण्ट्री मारली आहे. या संघात श्रीलंकेचा एकमेव खेळाडू असून त्याचे नाव कुमार संगक्कारा आहे.

‘विस्डेन’चा कसोटी संघ

ऍलिस्टर कूक (इंग्लंड), डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), कुमार संगक्कारा (श्रीलंका), स्टीवन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली (हिंदुस्थान), बेन स्टोक्स (इंग्लंड), ए बी डिव्हिलीयर्स (दक्षिण आफ्रिका), रविचंद्रन अश्विन (हिंदुस्थान), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), जेम्स ऍण्डरसन (इंग्लंड).

पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान नाही

‘विस्डेन’ व क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून निवडण्यात आलेल्या दशकातील सर्वोत्तम संघात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान देण्यात आलेले नाही. अफगाणिस्तान (राशीद खान) व बांगलादेश (शाकीब हसन) या देशातील खेळाडूंची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे.

वन डेचे नेतृत्व धोनीकडेच

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून दशकातील सर्वोत्तम वन डे व कसोटी संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला. वन डे संघात हिंदुस्थानच्या तीन खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली व रोहित शर्माचा समावेश आहे. वन डे संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडे सोपवले आहे. तसेच कसोटी संघात टीम इंडियाच्या फक्त एकालाच स्थान देण्यात आले आहे. विराट कोहलीला टेस्ट संघाचा कर्णधार बनविले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून निवडण्यात आलेला वन डे चमू

रोहित शर्मा (हिंदुस्थान), हाशीम आमला (दक्षिण आफ्रिका), विराट कोहली (हिंदुस्थान), ए बी डिव्हिलीयर्स (दक्षिण आफ्रिका), शाकीब हसन (बांगलादेश), जोस बटलर (इंग्लंड), महेंद्रसिंह धोनी (हिंदुस्थान, कर्णधार), राशीद खान (अफगाणिस्तान), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), लसिथ मलिंगा (श्रीलंका).

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून निवडण्यात आलेला कसोटी चमू

ऍलिस्टर कूक (इंग्लंड), डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), केन विल्यमसन (न्यूझीलंड), स्टीवन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली (कर्णधार, हिंदुस्थान), ए बी डिव्हिलीयर्स (दक्षिण आफ्रिका), बेन स्टोक्स (इंग्लंड), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया), जेम्स ऍण्डरसन (इंग्लंड).

आपली प्रतिक्रिया द्या