धाकट्या जावेला लग्नात जास्त दागिने दिले, विवाहितेची तीन मुलांसह आत्महत्या

धाकट्या जावेला तिच्या लग्नात एक दागिना जास्त घेतला, म्हणून एका विवाहितेने तीन मुलांसह आत्महत्या केल्याचं वृत्त आहे.

ही घटना उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे ही घटना घडली आहे. रंगीता असं या महिलेचं नाव आहे. तिच्या धाकट्या दिराचं लग्न मे महिन्यात होणार आहे. त्या लग्नात वधूच्या अंगावर घालण्यासाठी दागिने खरेदी करण्यात येत होते.

या दरम्यान रंगीताकडे जितके दागिने आहेत, त्यापेक्षा एक दागिना जास्त खरेदी करण्यात आला. ही बाब रंगीताला खटकली. तिने आरडाओरड सुरू केली. तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं की हे लग्न झाल्यानंतर तुलाही दागिना खरेदी करून देतो, मात्र ती रागातच होती.

त्याच रात्री तिने तिच्या तीन मुलांसह कीटकनाशक प्राशन केलं. तिन्ही मुलांना त्रास होऊ लागला तसे ती मुले ओरडू लागली. तेव्हा घरच्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रंगीता आणि तिच्या एका मुलाचा वाटेतच मृत्यू झाला. तर उर्वरित दोन मुलांवर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या