चिरनेर-रानसई रस्त्याच्या बाजूला महिलेचा भोसकलेल्या स्थितीत मृतदेह सापडला

756
murder-knife

चिरनेर-रानसई रस्त्यालगत निर्जन ठिकाणी कचऱ्यात एका महिलेचा भोसकलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. सोमवारी दुपारी एका वाहनचालकाला मृतदेह दिसला. त्यांनी याबाबत उरण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह ताब्यात घेतला. सुमारे 25 ते 28 या वयोगटातील ही महिला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तिच्या अंगावर पाठीवर आणि पोटामध्ये अनेक ठिकाणी धारदार शस्त्रास्त्राने भोसकल्याच्या खुणा आहेत. अंगावर पंजाबी ड्रेस असून यामध्ये फुलांचा कुर्ता आणि भगव्या रंगाचा पायजमा आहे. हातामध्ये हिरव्या रंगाचे दोन प्लास्टीकचे कडे आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविला. खूनाची बातमी परिसरात पसरल्यानंतर लोकांनी मृतदेह पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, अद्याप त्या महिलेची ओळख पटली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या