बोलेरोच्या धडकेत दुचाकीवरील नवविवाहितेचा जागीच मृत्यू

पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत बोलेरो व दुचाकीच्या अपघातात बोरी (ता. खंडाळा) येथील नवविवाहितेचा मृत्यू झाला. उमा भगवान धायगुडे (वय 24, रा. बोरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

वाई तालुक्यातील वेळे येथे सातारा बाजूकडे दुचाकीवरून नवविवाहित भगवान अप्पा धायगुडे (वय 31) व उमा भगवान धायगुडे (रा. बोरी) हे नवदाम्पत्य निघाले होते. ते वेळे गावच्या हद्दीत आले असता, त्यांच्या पाठीमागून आलेल्या बोलेरोने  त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकी सर्व्हिस रोडच्या कठडय़ाला घासत गेली. यामध्ये नवविवाहिता उमा हिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. या दाम्पत्याचा विवाह दोनच महिन्यांपूर्वी झाला होता. या घटनेची भुईंज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या