
गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना तोल जाऊन पडल्याने महिला ठार झाल्याची घटना वाघोली भागात घडली. लक्ष्मी नारायण माहुरे (वय 30, रा. वाघेश्वर मंदिराजवळ, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. बांधकाम मजूर महिलेला सुरक्षाविषयक साधने न पुरविता तिच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरोधात लोणीवंâद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुहास पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
डिफेन्स कॉलनी गृहप्रकल्पाचे काम करणारे बांधकाम व्यावसायिक निवृत्त लष्करी अधिकारी आहे. त्यांनी डिफेन्स कॉलनी नावाने गृहप्रकल्पाचे काम सुरु केले आहे. पाच दिवसांपूर्वी माहुरे वाघोलीतील डिफेन्स कॉलनी फेज चार गृहप्रकल्पातील इमारतीच्या छतावर लक्ष्मी काम करत होती. त्यावेळी तोल जाऊन ती अरूंद जागेतून (डक्ट) तळमजल्यावर पडली. त्यामुळे अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करत आहेत.
































































