केडगावमध्ये चोरीला गेलेले दागिने महिलेला दिले परत!

507

स्क्रू-ड्रायव्हरचा धाक दाखवून 60 वर्षांच्या महिलेच्या अंगावरील दागीने अज्ञात इसमांनी केडगाव बायपास परिसरात बळजबरीने काढून नेले होते. या घटनेतील चोरीला गेलेला ऐवज कोतवाली पोलिसांनी जप्त केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने चोरीला गेलेले दागीने महिलेला परत करण्यात आले आहेत. हसिना दाऊद शेख (वय 60, रा.मोहिनीनगर, केडगाव) या पुणे येथे जाण्यासाठी खासगी कारमध्ये बसल्या. कारचालकाने केडगाव बायपास परिसरातील मंगल कार्यालयाच्या पाठीमागे गाडी नेत त्यांना स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील 1 तोळा वजनाचे मंगळसूत्र, दोन अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, कानातील सोन्याची फुले व सोन्याचा वेल असा ऐवज चोरुन नेला. ही घटना 14 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली होती.

या गुन्ह्याच्या तपासात हा गुन्हा दत्ता उर्फ दत्तात्रय रामदास गाडे (वय 32, रा.गुनाट, ता.शिरुर, जि. पुणे) याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई स.पो. नि. नितीन रणदिवे, पोलीस नाईक नकुल टिपरे, पो.ना.गोरक्षनाथ काळे, मोहन भेटे यांनी केले. त्याच्याकडील हसिना शेख यांच्या अंगावरील चोरीस गेलेले दागीने जप्त केले. कायदेशीर कारवाईनंतर ते दागिने सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या हस्ते हसीना शेख यांना परत देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या