डांगे चौकात तरुणीवर भरदिवसा वार, आरोपी अटकेत

5

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील डांगे चौकामध्ये बुधवारी सकाळी एका तरुणीवर वार करण्यात आले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे पुणेकरांमध्ये घबराट पसरली आहे. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

बुधवारी (दि. २६) सकाळी दहाच्या सुमारास गौरी विठ्ठल माळी (वय, २० ,रा. डांगे चौक) हिच्यावर वार करण्यात आले. गौरी ही डांगे चौकातल्याच स्पंदन रुग्णालयात ‘रिसेप्शनिस्ट’ म्हणून काम करते. गौरीवर वार केल्याप्रकरणी विकास शांताराम शेटे (२१,रा. वाडा, खेड) याला अटक केली आहे. गौरी रोजच्याप्रमाणे कामावर येत होती, यावेळी विकासने पाठीमागून येऊन तिच्यावर चाकूने सपासप वार केले. विकासने हा हल्ला का केला हे अजून कळू शकलेलं नाहीये. या घटनेचा तपास वाकड पोलीस करत आहेत.