गडचिरोलीतील कुलकुली गावात महिलांचा दारुभट्टांवर हल्ला; बेकायदा भट्ट्या उद्ध्वस्त

587

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील कुलकुली या गावातील महिलांनी गावाजवळील जंगल परिसरातील बेकायदा दारुभट्ट्यावर हल्ला चढवला. त्यांनी एकूण 7 दारू भट्ट्यावरील 10 मडके आणि 8 ड्रम मोहाचा सडवा व 40 लिटर मोहाची दारू नष्ट केली. कुलकुली गावात गेल्या कित्येक वर्षांपासून बेकायदा दारू विक्री केली जात होती. त्यामुळे अनेकजण दारूच्या आहारी गेले होते. तसेच लहान मुलांनाही दारूचे व्यसन जडले होते. वाढत्या दारुविक्रीमुळे गावात भांडणाचे प्रमाणही वाढले होते. हा प्रकार थांबविण्यासाठी येथील महिलांनी मुक्तिपथ अभियानाच्या मदतीने गावातील बेकायदा दारू विक्रीच्या अड्ड्यावर हल्लाबोल केला. गावातील दारू बंद करण्यासाठी येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या वतीने दारू विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली होते. मात्र, दारूविक्रेत्यांनी त्यांना जुमानले नाही. त्यामुळे महिलांनी दारूबंदीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. यापुढे गावात दारू विक्री करणार नाही, असे विक्रत्यांकडून कबुल करुन घेतले. यावेळी पोलिसांनाही बोलवण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या