महिलांविषयी अश्लील बोलणाऱ्या मुख्याध्यापकाला महिला आयोगाचा दणका

सामना प्रतिनिधी, मुंबई

जाहीर कार्यक्रमात बोलताना जालना येथील रामनगरच्या शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गोरे यांनी महिलांविषयक अश्लील आणि वादग्रस्त विधाने केली होती. भाऊसाहेब गोरे यांच्या या वक्तव्याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली असून ८ दिवसात भाऊसाहेब गोरे यांना खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

भाऊसाहेब गोरे यांनी आपल्या भाषणातून जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी याआधीच त्यांच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातही पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात आली आहे. याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश जालना पोलिस अधिक्षकांना देण्यात आले आहेत.

summary- women commission filed sumoto petition