पुण्यात एका महिलेचे शीर वेगेळे करून तिचे धड नदीपात्रात फेकण्यात आले आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात खराडी परिसरात बांधकाम सुरू आहे. याच परिसराजवळ असलेल्या नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणजे या महिलेचे शीर धडावेगळे करण्यात आले होते तर तिचे हात आणि पायही कापून फेकण्यात आले होते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेचे वय 18 ते 30 असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मृत तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही.
या महिलेला मारून तिचे हात, पाय आणि शरीर धडावगळे करण्यात आले आहेत. ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने असे कृत्य केले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. तसेच या महिलेची ओळख पटवण्याचे आव्हानही पोलिसांपुढे आहे.