अन सारे गाव हळहळले, वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या मुलीचा अपघातात मृत्यू

752

वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्य दर्शनासाठी निघालेल्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिपी विमानतळ मार्गावरील गावडेवाडी येथे बुधवारी सकाळी घडली.

वेंगुर्ले तालुक्यातील परूळे आदिनारायण मंदिर येथील जेष्ठ दशावतारी संगितकार पुरूषोत्तम परूळेकर यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी मालवण-बिळवस गावची सरपंच असलेली त्यांची मुलगी रुपाली नाईक (वय -45) आपल्या मुलासोबत मोटारसायकलने परुळे येथील आपल्या माहेरी निघाली. चिपी विमानतळ नजीक चिपी-गावडेवाडी मार्गावर रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात रस्त्यावर पडलेल्या रुपाली नाईक यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परुळेसह बिळवस गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या