कोरोना टेस्टच्या रांगेत महिलेची प्रसृती, पाच कर्मचार्‍यांचे निलंबन

pregnant-women

उत्तर प्रदेशमध्ये एका गरोदर महिला कोरोना टेस्टच्यासाठी रांगेत उभी होती. तिला आधीच प्रसृती कळा सुरू होत्या. पण तिला दाखल करण्यापूर्वी टेस्ट करण्यास सांगिले. जेव्हा ती कोरोनासाठी स्वॅब देत होती. तेव्हाच तिची प्रसृती झाली. या प्रकरणी रुग्णालयाने पाच कर्मचार्‍यांना निलंबीत केले आहे.

लखनौमध्ये 22 वर्षीय महिला गरोदर होती. तिला प्रसृती कळा सुरू झाल्याने राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. पण कोरोना चाचणी झाल्याशिवाय दाखल करता येणार नाही असे प्रशासनाने सांगितले. तसेच कोरोना चाचणीसाठी रुग्णालयाने दीड हजार रुपये शुल्क सांगितले. महिलेच्या पतीकडे एवढे पैसे नव्हते. म्हणून त्याने पत्नीला कोरोना चाचणीसाठी रांगेत उभे केले आणि पैसे घेण्यासाठी घरी गेला. तेव्हा रांगेतच महिलेला प्रसृती कळा जोरात सुरू झाल्या आणि तिथेच तिची प्रसृती झाली.

महिलेला तत्काळ महिला वॉर्डमध्ये हलवण्यात आले. महिलेने एका मुलाला जन्म दिला असून आई आणि बाळ दोन्ही सुखरूप असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच या प्रकरणी पाच जणांना निलंबीत केले असून पुढील तपास सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या