शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू

22
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन। किनगाव

खानापूर येथील ग्राम पंचायतीने आधिगृहण केलेल्या बारचे पाणी घेण्यासाठी बटन चालू करतांना शॉक लागून महिलेचा मृत्यु झाला. तसेच तिची दिड वर्षाची मुलगी यात गंभीर जखमी झाली आहे. ज्योती दत्ता खांडेकर ( ३०) असे तिचे नाव आहे.

ज्योती अहमदपूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे राहत होती. ज्योती गावातील नागरिकांना बोरच्या पाण्याचे बटन चालू करुन पाणी देत असतांना स्टाटर मध्ये शॉक लागून तिचा जागेवर मृत्यु झाला. त्यावेळी तिची मुलगी रागिनी तिच्या कडेवर होती. यामुळे तीलाही शॉक लागला आहे. यात ती गंभीर जखमी झाली आहे. ज्योतीला एक मुलगा कृष्णा व दोन मुली त्यात अक्षरा आणि रागीनी आहेत.याबाबत किनगाव पोलीसात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या